सार्वजनिक सुट्यांमध्ये भारत अव्वल

holiday
मुंबई : सर्वांनाच हवीहवीशी असते ती म्हणजे सुट्टी, पण एका ट्रॅव्हल पोर्टलच्या अभ्यासातून जगातील इतर देशांपेक्षा आपल्या भारत देशात सर्वाधिक सार्वजनिक सुट्या असल्याचे समोर आले आहे. खरेतर विकसनशील देशांमध्ये कामगारांना फारशा सुट्टया मिळत नाहीत, असा समज अनेकांचा असतो. हा समज भारतासाठी चुकीचा ठरला आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत भारताचे शेजारील देशही काही मागे नाहीत. चीन, फिलिपाईन्स, हाँगकाँग आणि मेलेशिया यासारख्या देशांमध्येही ब-याच सुट्ट्या असतात.

तब्बल २१ सार्वजनिक सुट्टयांसह जगभरातील देशांच्या तुलनेमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सुट्टया आणखी वाढतात. एका ट्रॅव्हल पोर्टलने केलेल्या अभ्यासातून अनेक देशांच्या सार्वजनिक सुट्टयांची यादीच तयार झाली आहे. वीगो नावाच्या या कंपनीचे मार्केटिंगचे प्रमुख जोचिम होल्टे यांनी सांगितले की, सुट्ट्यांचा मजा घेण्यामध्ये फिलिपाइन्सचा दुसरा क्रमांक लागतो. तिथे वर्षात १८ सार्वजनिक सुट्ट्या असतात. तर चीन आणि हाँगकाँग मध्ये १७, थायलंडमध्ये १६, मलेशिया आणि व्हिएतनाम १५, इंडोनेशियामध्ये १४, तैवान आणि द. कोरियामध्ये १३, सिंगापूरमध्ये ११ आणि ऑस्टड्ढेलिया-न्यूझीलंडमध्ये १० सार्वजनिक सुट्ट्या असतात. युरोपमधील देशांमध्ये देखील सुट्ट्यांचे प्रमाण चांगलेच आहे. स्वीडन आणि
लुथीनिया मध्ये १५, झेकोस्लोव्हाकियामध्ये १४, ऑस्टिड्ढया, बेल्जियम आणि नॉर्वे १३, फिनलँड आणि रशिया १२ सुट्ट्या मिळतात. यूएईमध्ये ११, तर सुट्ट्याचा बाबतीत स्पेन आणि इंग्लंड या देशांचा सर्वात शेवटचा क्रमांक लागतो. या दोन्ही देशांमध्ये फक्त ८ सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात.

Leave a Comment