शेट्टींच्या आंदोलनाला सेनेचा पाठींबा

combo
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

सरकारविरोधात ऊस दराच्या आंदोलनासाठी राजू शेट्टींनी आधीच ‘एल्गार’ पुकारला असून त्यातच मंत्रिमंडळात सामावून न घेतल्याने राजू शेट्टी नाराज आहेत. तसेच, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यापुढे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नसल्याचे राजू शेट्टींनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत नाराज शेट्टींना पुन्हा जवळ करण्याचा शिवसनेने प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उद्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहेत. ऊसाच्या ‘एफआरपी’ चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी, मुख्यमंत्री केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करणार आहेत. तसेच, राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळही ‘एफआरपी’ च्याच मुद्यावर अरुण जेटलींची भेट घेणार आहे.

Leave a Comment