युजर स्वतःच असेंबल करेल गुगलचा स्मार्टफोन

google
प्रोजेक्ट आरा या आपल्या फोन डिझायनिंग प्रोजेक्टमध्ये गुगलने अनोख्या स्मार्टफोनची प्रात्यक्षिके सादर केली आहेत. दरवर्षी भरविल्या जात असलेल्या कंपनीच्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये या फोनची संकल्पना मांडली गेली आहे. स्पायरल टू या नावाने हा फोन तयार केला गेला आहे. तंज्ञ विशारदांच्या मते हा प्रोजेक्ट एकदमच खास आहे.

स्पायरल टू मध्ये युजरच्या गरजांना प्राधान्य दिले गेले आहे. युजरला ज्या बाबी गरजेच्या वाटतात, त्यानुसार तो आपला फोन स्वतः डिझाईन करू शकणार आहे. कंपनीकडून सर्वसाधारणपणे सर्व युजरसाठी एकच डिझाईन केले जाते त्याऐवजी या स्मार्टफोनचे हार्डवेअर युजर डिझाईन करू शकणार आहे. म्हणजे एखाद्याला स्लो प्रोसेसर चालेल पण हाय पॉवर कॅमेरा हवा असेल,एखाद्याला कॅमेरा कमी क्षमचेचा पण रॅम अधिक हवी असेल तर युजर त्याप्रमाणे आपला फोन डिझाईन करेल व त्यानुसारच फोनची किंमतही ठरेल.

युजरला हवी असलेली फिचर्स मॅग्नेटच्या सहाय्याने फोनमध्ये जोडता येणार आहेत. म्हणजे हा फोन तुकडे करून पुन्हा जोडता येणार आहे. फोनचा बाहेरचा ढाचा समान असेल मात्र त्यात गरजेनुसार हार्डवेअर कंपोनंट जोडता येतील. कॅमेरा, स्पीकर, बॅटरी, डिस्प्ले, अॅप्स, प्रोसेसर, वायरलेस कनेक्टीव्हीटी सगळे मॅग्नेटच्या सहाय्याने जोडता येणार आहे. कंपनीला यामुळे फ्यूचर स्मार्टफोन बनविणे अधिक सोपे जाणार आहे असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे मॉड्युलर स्मार्टफोन सादर करणारी गुगल ही एकमेव कंपनी आहे.

Leave a Comment