प्लुटोकडे झेपावले नासाचे यान !

nasa
वॉशिंग्टन : प्लुटो ग्रहाकडे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ चे ‘न्यू होराईझन’ हे अंतराळयान झेपावले असून सहा महिन्यांच्या या मोहिमेला सुरुवात करण्यात आल्याची अधिकृत घोषणा ‘नासा’ ने केली.

१४ जुलै रोजी प्रथम प्लुटोच्या जवळ ‘नासा’ च्या नियोजनानुसार हे अंतराळयान जाऊन पोहचणार आहे. एकूण नऊ वर्षांमध्ये सुमारे ४ हजार ८०० कोटी किलोमीटर अंतर पार करून डिसेंबरमध्ये प्रथम ते स्थिरावले. अवकाशातील धुळीचा वेध घेणा-या यंत्रासह अनेक वैज्ञानिक साहित्याने सज्ज असे हे यान काल प्लुटो मोहिमेसाठी सज्ज झाले.

पृथ्वीवरून उड्डाण केलेल्या कोणत्याही यानाने प्राथमिक लक्ष्य गाठण्यासाठी कापलेल्या अंतरांपेक्षा सर्वाधिक अंतर आम्ही पूर्ण केले आहे आणि पुढील संशोधनासाठी आम्ही तयार आहोत,’ असे ‘न्यू होराईझन’ चे प्रमुख एॅलन स्टेर्न यांनी सांगितले. या यंत्रणेतील लांब पल्ल्याच्या इमेजरचा वापर करून प्लुटोच्या कक्षेतील विविध बाबींची छायाचित्रे टिपण्याचे काम २५ जानेवारी रोजी सुरू होईल, असे ‘नासा’ च्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment