दोन देशांच्या सीमेवरचे अनोखे घर

belgium
जगभरात ज्या ज्या देशांच्या सीमा एकमेकांना लागून असतात, तेथे वादविवाद नेहमीच होत असतात. भारत चीन, भारत पाक, तिबेट चीन ही त्याची कांही ठळक उदाहरणे म्हणता येतील. मात्र जगातील अन्य देशही त्यांना अपवाद नाहीत. हा सीमाभाग नेहमीच मोठा संवेदनशील प्रश्न असतो. येथे कांहीही नवीन करायचे तर हजारवेळा विचार केल्याशिवाय निर्णय घेणे अशक्यच असते. मात्र कांही सीमा या सर्व गोष्टींना अपवादही आहेत. त्यांचीच ओळख आपण करून घेत आहोत.

अशा आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये सुरक्षा दंडक, कागदपत्रे पूर्तता यांच्या कटकटींशिवाय जीवनाचा आनंद लुटणारे नागरिक आहेत. बेल्जियम नेदरलंडची सीमा त्याचे उत्तम उदाहरण आहे.बेल्जियममधील बार्ले नस्सो आणि नेदरलँडमधील बार्ले हेटिंग यांच्या सीमेवर एक घर आहे आणि या घराला चक्क दोन पत्ते आहेत. एक नेदरलँडचा आणि दुसरा बेल्जियमचा. घराला दरवाजा एकच आहे मात्र डोअरबेल दोन आहेत. चुकीची बेल वाजविली तर दुसर्‍या देशात ती वाजते.
irland

अमेरिकेतील अॅरिझोना आणि मेक्सिको यांची सीमा फेन्सिंग घालून वेगळी केली गेली आहे. मात्र दरवर्षी या फेन्सिंगचा उपयोग करून येथे व्हॉलीबॉल सामने खेळले जातात. दोन्ही देशातील लोक यात सामील होतात. बरेचवेळा रस्त्याने या देशातून त्या देशात जायची परवानगीही येथील नागरिक आणि पोलिसही उदारमनाने देतात. अलिकडेच येथे १३ फुटी भिंत बांधल्याने थोडी अडचण होते आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
norway

ग्रीन जोन- टॉर्नियो गोल्फ कोर्ट असेच अनोखे मैदान आहे. फिनलंड आणि स्वीडनच्या सीमेवर असणारे हे गोल्फ कोर्स. यातील ९ होल फिनलंड मध्ये आहेत तर बाकीची नऊ होल स्वीडनमध्ये. दोन्ही देशातील नागरिक आणि खेळाडू येथे कोणत्याही वेळी गोल्फची मजा लुटू शकतात.

Leave a Comment