गुगलने बाळासाहेबांवर डुडल बनवावे- शिवसेना

bala
मुंबई -इंटरनेट सर्च इंजिन गुगलने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही श्रद्धांजली देणारे डुडल बनवावे असे पत्र शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी गुगलला लिहिले आहे. शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार गुगल वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून महापुरूष आणि सेलब्रिटींच्या सन्मानासाठी अशी डुडल तयार करते. बाळासाहेबांची ८९ वी जयंती २३ जानेवारीला येत आहे. त्या दिवशी असे डुडल बाळासाहेबांसाठीही तयार केले जावे.

शेवाळे यांनी या संदर्भात वित्तमंत्री अरूण जेटली यांनाही पत्र लिहिले असून माहिती प्रसारण मंत्रालयालाही या संदर्भात मदत करण्यासाठी विनंती केली आहे. शेवाळे यांनी या संदर्भात गुगलला ६ जानेवारीला तर अरूण जेटली यांना ८ जानेवारीला पत्र लिहिले असल्याचे सांगितले.

Leave a Comment