ऑडीची आर ८ एलएमएक्स स्पोर्टस कार लाँच

audi
मुंबई – जर्मन कारमेकर ऑडीने त्यांची ऑडी आर ८ एलएमएक्स स्पोर्टस कारची लिमिटेड एडीशन गुरूवारी भारतात लाँच केली असून तिची किंमत आहे २ कोटी ९७ लाख रूपये. भारतात सादर केली गेलेली ही पहिली लेझर हायबीम कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

लेझर हायबीम मुळे रस्त्यातील व्हिजिबिलिटी वाढण्यास मोटी मदत मिळते आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे असते असे कंपनीचे म्हणणे आहे. या कारचे लाईट ताशी ६० किमी वेगाने अॅक्टीव्हेट होतात. कार ३.४ सेकंदात १०० किमी चा तर आणखी कांही सेकंदात ३२० किमीचा वेग पकडू शकते. ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग म्हणाले की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ऑडी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. लेझर हायबीम एलईडी चा वापर प्रथम ऑडी आर ८ एटरन क्याटरोत केला गेला आहे. भारतात बनलेल्या कारमध्ये ही सुविधा प्रथमच दिली गेली आहे. स्पोर्टस कारसाठी हा नवा शोध अत्यंत शानदार आहे.

Leave a Comment