मार्क झुकेरबर्ग यांची कोलंबियाला विशेष भेट

mark
कोलंबिया : फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी कोलंबियातील मोबाईल धारकांना विशेष भेट दिली आहे. कोलंबियाच्या दौ-यावर गेलेल्या झुकेरबर्गने सर्वसाधारण मोबाईल वापरणा-या नागरिकांना रोजगार, आरोग्य, वित्त आणि संवाद यासारख्या महत्वाच्या क्षेत्रातील काही संकेतस्थळांना भेट देण्यासाठी मर्यादित स्वरुपात वायफायच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

याबाबतच निर्णय अध्यक्ष जॉन मॅन्युएल सॅन्टो यांच्यासोबत झुकेरबर्ग यांच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे. आपल्या इंटरनेट डॉट ओआरजी या प्रकल्पांतर्गत विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरविण्यात आलेला झांबिया, केनिया आणि टांझानियानंतरचा कोलंबिया हा चौथा देश ठरला आहे. झुकेरबर्ग प्रथमच कोलंबियाच्या दौ-यावर आले होते. यावेळी झुकेरबर्ग यांनी दौ-यापूर्वी येथील जैव वैविध्यतेबाबत माहिती घेतल्याचे सांगत शकीराचा फॅन असल्याचेही सांगितले. या दौ-याबाबत फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये झुकेरबर्ग यांनी, कोलंबियातील ५० टक्के लोकांना रोजगार, आरोग्य, अर्थ आणि संवाद या क्षेत्रांसाठी मर्यादित स्वरुपात विनामूल्य इंटरनेट उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Comment