मायक्रोमॅक्सने आणला जबरदस्त बॅकअप असलेला स्मार्टफोन

micromax
मुंबई – मोबाईल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने तब्बल ३० दिवसांचा बॅटरी बॅकअप असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच केल्यामुळे बॅटरी डाऊन होईल याची चिंता राहणार नाही.

स्मार्टफोनमध्ये नव-नवे अॅप, गेम्स आणि इंटरनेटच्या सततच्या वापरामुळे बॅटरी बॅकअप मिळत नसल्यामुळे स्मार्टफोन लगेच ‘डाऊन’ होतात. परिणामी युझर्स कंटाळतात. स्मार्टफोन युझर्सची ही कटकट मिटवण्याचा प्रयत्न मायक्रोमॅक्सने केला आहे. मायक्रोमॅक्सने एक असा स्मार्टफोन आणला आहे, ज्याची बॅटरी एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल महिनाभर चालेल. ‘मायक्रोमॅक्स कॅनव्हास ह्यू’ असे या फोनचे नाव आहे. ३० दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह जबरदस्त फिचर्स असलेला हा एक बजेट फोन आहे. याची किंमत१०,९९९ रुपये इतकी आहे. याची बॅटरी ३०००mAh क्षमतेची असून, सुपर पॉवर सेविंग मोडवर ही बॅटरी तब्बल तीस दिवस चालू शकेल, असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment