ऑफिससाठी ‘फेसबुक अ‍ॅट वर्क’ ही सुविधा अधिकृत

facebook
सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या वापरावर अनेक कार्यालयामध्ये बंदी आहे. पण आता या कंपन्यांमधील कर्मचा-यांनाही ऑफिसमध्येच फेसबुक वापरता येईल. कंपन्यांमध्ये अंतर्गत वापर करता येईल यासाठी फेसबुकने फेसबुक अ‍ॅट वर्क ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर
काही कंपन्यांमध्ये याची चाचपणी सुरू असून या कंपन्यांचे कर्मचारी वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेत आहेत.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच फायनान्शियल टाइम्सने फेसबुक अशी सुविधा सुरू करणार असल्याचे वृत्त दिले होते. तर टेक क्रंचच्या जूनमधील वृत्तानुसार फेसबुकच्या लंडनमधील ऑफिसमधील कर्मचारी आधीच या सुविधेचा वापर करत होते. फेसबुकच्या या सुविधेमुळे यॅमर, स्लॅक यांसारख्या कंपन्यांना आव्हान निर्माण होणार आहे.फेसबुक अ‍ॅट वर्कमध्ये फेसबुकप्रमाणे न्यूज फीड, ग्रुप, मेसेज आणि इव्हेंट यासारख्या सुविधा उपलब्ध असल्यातरी त्या केवळ संबंधित कंपनीपुरत्या मर्यादित राहणार आहेत. या कंपन्यांमधील कर्मचा-यांची माहिती बाहेरच्या व्यक्तींना पाहता येणार नाही, तसेच त्यांचे व्यक्तिगत प्रोफाईल कंपनीच्या प्रोफाईलपासून वेगळे असेल. ही सुविधा मोफत असेल की सशुल्क हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment