आता फळांच्या राजापासुनही बनणार वाईन

mango
रत्नागिरी – संयुक्त संशोधन समितीच्या सभेने कोकणातील जगप्रसिध्द आणि फळांचा राजा म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या हापूस आंब्यापासून वाईन तयार करण्याच्या संशोधनाला मान्यता दिली असून कोकणातील फळांपासुन विविध प्रकारच्या प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबरच वाईनचे उत्पादन सुरु झाल्यास फळांचा होणारा र्‍हास कमी होणार आहे.

देशविदेशातून कोकणच्या हापूस आंब्याला मागणी असून ८० टक्के क्षेत्रावर आंबा आंब्याची लागवड केली जाते. उत्पादीत आंब्यांपैकी सुमारे २० ते ३० टक्के उत्पादन वेगवेगळ्या कारणास्तव फुकट जाते. असा आंबा वाईन बनवण्यासाठी उपयोगी येऊ शकणार आहे. वाईन बनवण्याचे हे संशोधन दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात २०१० पासून सुरु झाले होते. आता या संशोधनाला यश मिळाले आहे.

Leave a Comment