यावर्षात एटीएम येणार दारी

atm
नवीन प्रकारची आणि ग्राहकाला फार दूर न जाता घराच्या दारात सेवा देऊ शकणारी अत्याधुनिक एटीएम यंत्रे या वर्षातच भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. या नव्या एटीएममुळे ग्राहकांचा वेळ वाचेल, बँकांना एटीएमसाठी कराव्या लागणार्‍या खर्चात बचत होईल असे सांगितले जात आहे. याची प्रात्यक्षिके मुंबईत १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या आयबेक्स बँक प्रदर्शनात दाखविण्यात आली आहेत.

या एटीएममुळे प्रत्येक व्यक्तीला सुविधा उपलब्ध होणार आहे कारण ही मशीन घराच्या भिंती, बस, मेट्रो ट्रेन, किराणा दुकाने अशी कुठेही फिट करता येतात. त्यांना सुरक्षा गार्ड, वीज, एसी, वेगळी केबिन अशी कोणतीच गरज भासत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याच्या नावावरचे पैसे काढण्याचा प्रयत्न केलाच तर जवळच्या पोलिस ठाण्याचा अलार्म वाजतोच पण संबंधित व्यक्तीचा पूर्ण फोटोही मशीनमध्ये बंदिस्त होतो. या आधुनिक मशीन्समुळे बँकांच्या खर्चातही वर्षात १०० कोटी रूपयांची बचत होऊ शकणार आहे. या प्रदर्शनात एटीएमची अनेक मॉडेल्स सादर केली गेली आहेत.