सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणार १ हजार रुपये दंड!

smoking
नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धूम्रपानविरोधी कायदा आणखी कडक करण्यासाठी ठोस पावले उचलली असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना २०० रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड ठोठावण्याची शिफारस मंत्रालयाने केली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्‌मध्ये सध्या असलेले “स्मोकिंग झोन’ बंद करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

धूम्रपानविरोधी कायदा कडक करण्यासाठी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या कायद्यात आणखी कडक सुधारणा सुचवल्या आहेत. धूम्रपानासाठी पात्र वय सध्याच्या १८ वर्षांवरून २१ वर्षांपर्यंत वाढवणे, सिगरेटच्या सुट्या विक्रीवर बंदी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना आधी सुचवलेल्या २०० रुपये दंडाऐवजी १ हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद, अशा शिफारशी आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत. सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरातींवर प्रतिबंध आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा कायदा 2015 मध्ये अनेक महत्त्वाच्या शिफारशी मंत्रालयाने केल्या आहेत. या कायद्यातील सुधारणांबाबत जनतेकडून सूचना मागवण्यात येत आहेत. याचबरोबर हॉटेल्स, सिनेमागृहे आणि रेस्टॉरंटस्‌मध्ये सध्या अस्तित्वात असलेले “स्मोकिंग झोन’ बंद करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment