फेरारीचा भारतात पुर्नप्रवेश

ferrari
इटालियन लग्झरी स्पोर्टस कारमेकर फेरारी ने भारतीय बाजारात पुर्नप्रवेश केला असून देशात दोन नवीन वितरकांची नेमणूक केली आहे. यापूर्वी फेरारी आयातीसाठी कंपनीने श्रेयान्स ग्रुपशी करार केला होता त्यानुसार मार्च २०१५ पर्यंत श्रेयान्सकडून फेरारींची विक्री केली जाणार आहे. मात्र त्यानंतर नवीन वितरकांकडूनच या कार ग्राहकांना मिळू शकणार आहेत. दोन नवीन वितरकांच्या नेमणुकीने कंपनीने भारतात अधिकृत अस्तित्व निश्चित केले आहे.

कंपनीतील अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारत ही फेरारीसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. दिल्ली आणि मुंबईत सुरू होत असलेल्या दोन नवीन केंद्रातून विक्री आणि विक्रीपश्चात सेवा अशा दोन्ही सुविधा मिळणार आहेत. हे वितरक नवीन ग्राहकांप्रमाणेच जुन्या फेरारी मालकांनाही सेवा देणार आहेत. फेरारीने भारतात २०११ सालीच श्रेयान्स ग्रुपची अधिकृत आयातदार म्हणून करार करून नेमणूक केली होती मात्र ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाल्याने हा करार संपुष्टात आणण्यात आला आहे. फेरारीच्या कॅलिर्फोर्निया, ४५८ इटालिया, ५९९ जीबीटी फिआर्नो या कार भारतात उपलब्ध आहेत आणि त्यांची किमत २.२ कोटींपासून ३.४ कोटींपर्यंत आहे.

Leave a Comment