निवडणूक आयोगाचे दिल्ली निवडणूक अॅप

dilli
दिल्ली – दिल्लीतील मतदारांसाठी निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणूक अॅप उपलब्ध केले असून यामुळे मतदारांना आपले नांव मतदार यादीत तपासून पाहणे अतिशय सुलभ होणार आहे. दिल्लीत ७ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि १० तारखेला निवडणूक निकाल लागणार आहे.

निवडणूक अधिकारी म्हणाले की, दिल्ली इलेक्शन अॅप हे अँड्राईड अॅप आहे. आजकाल स्मार्टफोन वापरणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे हे अॅप मतदारांना उपयुक्त ठरेल. यामुळे मतदारयादीतील नाव शोधणे, मतदार नोंदणीसाठी अर्ज दिला असेल तर त्याचे स्टेटस जाणून घेणे, मतदारकेंद्राची माहिती, बुथची माहिती, निवडणूक अधिकारी आणि बूथ लेव्हल अधिकारी यांची माहिती, शिवाय निवडणुकीसंदर्भातली अन्य माहिती लोकांना घरबसल्या समजू शकणार आहे.

आयोगाने मतदार यांदीत नाव आहे वा नाही हे पाहण्यासाठी एसएमएस सेवाही नुकतीच सुरू केली आहे.

Leave a Comment