‘डीआरडीओ’च्या प्रमुखांची हकालपट्टी

drdo
नवी दिल्ली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे (डीआरडीओ) प्रमुख अविनाश चंदर यांना केंद्र सरकारने पदावरून हटवले असून निवृत्तीच्या १५ महिनेआधीच चंदर यांना पदावरून दूर करण्यात आले असून ते ३१ जानेवारी २०१५पर्यंत या पदावर काम करू शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डीआरडीओचे प्रमुख चंदर यांना पदावरून हटवण्याला मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील नोटीस जारी केली असून ते ३१ जानेवारीपर्यंत कार्यालयात काम करू शकतील. विशेष म्हणजे चंदर यांच्याकडे ‘डीआरडी’चे सचिवपद देखील आहे. तसेच ते संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. चंदर गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजीच निवृत्त झाले होते. मात्र त्यावेळी त्यांचा करार १८ महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. तो ३१ मे रोजी संपुष्ठात येणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ‘डीआरडीओ’ला भेट दिली होती. त्यावेळी संस्थेतील कारभार संथ गतीने चालल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment