गंगासागरावर लोटला भक्तांचा सागर

ganga
गंगासागर- मकरसंक्रांतीच्या पवित्र स्नानासाठी भारतातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या गंगासागर या ठिकाणी यंदा सुमारे २० लाख भाविक जमले आहेत. मंगळवारपासून या पवित्र स्नानाची सुरवात झाली असून देशभरातील भाविक, अनेक साधूसंत या स्नानाची पर्वणी गाठण्यासाठी येथे आले आहेत. यंदा १० लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट भाविक आले आहेत.

यात्रेकरूंना निवासासाठी २०० शिबीरांची व्यवस्था प.बंगाल सरकारने केली असून यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांबरोबरच ड्रोनही तैनात करण्यात आली आहेत. गंगासागर येथे दरवर्षी मकरसंक्रांतीला पवित्र स्नान करण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे. स्नानानंतर कपिल मुनींच्या आश्रमात पूजा करण्याची प्रथा आहे. या ठिकाणी सागराला गंगा मिळते. हिंदू पुराणातही या स्थानाचे उल्लेख आढळतात.

Leave a Comment