आता गुगल अ‍ॅपद्वारे संभाषणाचे होणार तात्काळ भाषांतर

google
वॉशिंग्टन : दिवसेंदिवस इंटरनेट क्षेत्रात नवनवीन बदल होत असून, गुगलने संभाषणाचे तात्काळ भाषांतर करणारे अ‍ॅप तयार केले आहे. काही दिवसातच हे मोबाईल अ‍ॅप नेटिझन्सच्या सेवेसाठी रुजू होणार आहे. इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगलने सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. विविध भाषांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करणारी सेवा उपलब्ध करून देणारी सेवा यापूर्वीच उपलब्ध झाली आहे. मात्र, मोबाईल ग्राहकांची गरज ओळखून नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपमुळे कोणतीही भाषा येणा-या व्यक्तीशी बोलताना आपल्याला अडचण येणार नाही. ‘द व्हेर्गे’ दिलेल्या वृत्तानुसार, ‘अ‍ॅड्रोईड मोबाईलधारकांना ‘गुगल ट्रान्सलेट स्पीच’ या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. संभाषण करत असताना विविध भाषांमध्ये त्याचे भाषांतर वाक्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment