तुम्ही कल्पनांना मारू शकत नाही : झुकेरबर्ग

mark
कॅलिफोर्निया : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी तुम्ही कल्पनांना मारू शकत नाही, जोपर्यंत आपण परस्परांशी जोडलेले आहोत तोपर्यंत कोणीही आपल्यावर हल्ला करू शकत नाही असे म्हटले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टद्वारे झुकेरबर्गने भावना व्यक्त केल्या असून जगभरातून विविध धर्माच्या, विविध वयोगटातील, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी एकत्र येऊन काढलेल्या मार्चचे व्हिडिओ पाहिले. जोपर्यंत आपण परस्परांशी जोडलेले आहोत. तोपर्यंत कोणीही आपल्यावर हल्ला करू शकत नाही. असा हल्ला नायजेरियात, पाकिस्तानात, फ्रान्समध्ये अथवा कोठेही होऊ शकणार नाही . एका स्वातंत्र्याच्या तसेच स्वीकृतीच्या ऐतिहासिक मार्गाने पुढे जाऊयात.

Leave a Comment