ट्विटरला फेसबुकची धोबी पछाड

facebook
वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेव संशोधन केंद्राने केलेल्या एका सर्वेक्षणात फेसबुक हे वापरकर्त्यांसाठी अत्यंत प्रभावी असे माध्यम असल्याचा दावा सिद्ध झाला आहे. फेसबुकच्या तुलनेत अन्य सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावरील वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असून फेसबुक त्यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

या सर्वेक्षणात इंटरनेट वापरकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यापैकी सुमारे ७१ टक्के लोक फेसबुक युजर्स होते. २८ टक्के लिंक्डइन आणि पिंटरेस्ट, तर ट्विटरचे २३ टक्के युजर्स होते. त्यांच्या मते, ऑगस्ट २०१३ पासून आतापर्यंत त्यांना यात कोणताच बदल जाणवला नाही. फेबुकशी एकदा जोडला गेलेला युजर्स पुन्हा त्यावरून जात नसल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. फेसबुकचे ७० टक्के युजर दिवसात एकदा तरी यावर लॉगइन करतात. त्यातील ४५ टक्के युजर्स दिवसातून अनेकदा फेसबुकचा वापर करत असल्याचेही यात आढळले. इन्स्टाग्रामच्या युजरपैकी निम्मे युजर्स आणि पिंटरेस्टचे १७ टक्केच युजर्स दिवसातून एकदा या संकेतस्थळावर लॉगइन करतात, तर ट्विटरचे ३६ टक्के युजर्स दिवसातून एकदाच याचा वापर करतात, असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Leave a Comment