नवी दिल्ली – अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लीकेशन सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या ए. एस. किरण कुमार यांची भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इस्त्रोच्या अध्यक्षपदी ए.एस. किरण कुमार यांची नियुक्ती
इस्त्रोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानले जाणारे चांद्रयान – १ आणि मंगळयान प्रोजेक्टमध्ये किरण कुमार यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. तसेच भारताचा पहिला रिमोट सेन्सर्सवर चालणारा उपग्रह भास्कर विकसित करण्याच्या कामामध्येही किरण कुमार यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. किरण कुमार यांनी भौतिकशास्त्रात आपले शिक्षण पूर्ण केले आहे.