चंद्राच्या कक्षेत चीनचे यान दाखल

china
बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने मानवरहित यान चंद्रावर उतरवून काही तासातच ते पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा यशस्वी होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. या देशाचे यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे.

शिनुआ वृत्तसंस्थेनेही याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनच्या यानाचे सर्व्हिस मोड्युल यानापासून यशस्वीपणे वेगळे झाले असून, ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती बीजिंगच्या अंतराळ नियंत्रण केंद्राने दिली.

आमच्या यानाने सनतोल ऊर्जा राखली असून, त्याची स्थिती अतिशय उत्तम आहे. यानाचे संपूर्ण नियंत्रण व्यवस्थितपणे पार पाडले जात आहे. मोड्युलवरील दुसरी आणि तिसरी प्रक्रिया सोमवारी व मंगळवारी करण्यात येणार आहे. पुढील चांद्रयान शोध मोहीम हाती घेण्यासाठी हा टप्पा पूर्णपणे यशस्वी होणे आवश्यक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी चीनने ही मोहीम हाती घेतली होती.

Leave a Comment