एल्काटेल कंपनीने त्यांचा पिक्सी ३ स्मार्टफोन सादर केला असून त्याचे खास वैशिष्ठ म्हणजे हा फोन एकापेक्षा अनेक ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकणार आहे. अर्थात एकाचवेळी सर्व ऑपरेटिंग सिस्टीम वापरता येणार नाहीत.
एल्काटेलचा पिक्सी ३ – अनोखा स्मार्टफोन
हा फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकाने त्याला विंडोज, फायरफॉक्स, अँड्राईड अशी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम हवी ते ठरवायचे आहे. त्यानुसार ग्राहकाने निवडलेली ओएस त्याला मिळू शकणार आहे. याच बरोबर स्क्रीन साईज निवडीचा चॉईसही ग्राहकाला दिला गेला आहे. ३.५, ४,४.५, व पाच इंची अशी कोणताही स्क्रीन ग्राहक निवडू शकणार आहे.
३.५ इंची स्क्रीनसाठी थ्रीजी कनेक्टीव्हीटी असेल तर बाकी स्क्रीनसाठी फोरजी,एलईटी सपोर्ट ग्राहकाला मिळणार आहे. या स्मार्टफोनची बाकी कोणतीही फिचर्स जाहीर करण्यात आलेली नाहीत तसेच त्यांच्या किमतीही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र बाजारात इतक्या प्रचंड व्हरायटीचे फोन अगोदरच असताना अशी अनोखी व्हरायटी या कंपनीने दिल्याने ग्राहकांत या फोनबद्दल उत्सुकता आहे हे नककी.