निःशुल्क ‘स्वच्छ भारत’ अभियानाची कॉलर ट्युन्स - Majha Paper

निःशुल्क ‘स्वच्छ भारत’ अभियानाची कॉलर ट्युन्स

swachha
नवी दिल्ली – पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानात जास्तीतजास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकार आता नवनव्या कल्पनांचा उपयोग करीत असून या अभियानाविषयी जनसामान्यांच्या मनात उत्सुकता आणि सहभागाची इच्छा निर्माण व्हावी यासाठी या अभियानाच्या ‘कॉलर ट्युन्स’ तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अशा तीन ट्युन्स असून, त्या निःशुल्क प्राप्त होणार आहेत.

या तीन पैकी कोणतीही एक ट्युन निवडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना राहणार आहे. पुढील ९९९ दिवसांकरिता त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र त्यानंतरच्या ९९९ दिवसांकरिता ही ट्युन सुरू ठेवण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्या किरकोळ मासिक शुल्क आकारणार आहेत. सध्यातरी काही मर्यादित मोबाईल कंपन्यांसाठीच ही ट्युन उपलब्ध करून देण्यात आली असून, संबंधित कंपनीची सेवा वापरणार्‍या सर्व ग्राहकांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment