अमेरिकन मोबाईल कंपनी सैजेल ने लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रोनिक शो २०१५ मध्ये ३२० जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. व्ही स्क्वेअर व्ही टू नावाने हा नवा हँडसेट सादर करण्यात आला असून तो यावर्षातच अमेरिकन बाजारात दाखल होणार आहे.
सैजलचा ३२० जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन
वास्तविक या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ६४ जीबीची आहे मात्र त्याला १२८ जीबी ची दोन मायक्रो एसडी कार्ड वापरता येणार आहेत व यामुळे युजरला ३२० जीबीची मेमरी उपलब्ध होऊ शकणार आहे. या स्मार्टफोनसाठी ५ इंची फुल एचडी डिस्प्ले, अँड्राईड किटकॅट, २१ एमपीचा रियर व १३ एमपी चा फ्रंट कॅमेरा, वायफाय बँड सपोर्ट, फ्रंट स्पिकर, पॉवर सेव्हींग चीप, फिंगरप्रिट स्कॅनर, वायरलेस चार्जिंग, वॉटरप्रूफ अशी अन्य फिचर्स दिली गेली आहे. हा स्मार्टफोन स्लीम कॅटेगरीतील आहे. शिवाय कंपनीने अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोन स्वस्त असेल असेही सूचित केले आहे. फोनची किंमत मात्र अद्यापी जाहीर केली गेलेली नाही.