सरकारी कार्यालयांची गोमुत्राने होणार सफाई

gomutra
नवी दिल्ली – मोदी सरकारने आता सर्वच सरकारी कार्यालयांची सफाई करण्याची आगळीच मोहीम हाती घेतली असून पण, ही स्वच्छता फिनाईल किंवा अत्याधुनिक नायझॉलने करण्यात येणार नसून, यासाठी गोमुत्राचा वापर करण्यात येणार आहे. ‘गौनायल’ या नावाने ते उपलब्ध होणार आहे.

याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. सरकारी कार्यालयाना चकाचक करण्यासाठीच यापुढे गोमुत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्याचा गंध यायला नको यासाठी या गौनायलला सुगंधित करण्यात येणार असून, यासाठी त्यात काही नैसर्गिक वनस्पती समाविष्ट करण्यात येणार आहेत. या गौनायलच्या वापरामुळे हानिकारक रसायनांपासून रक्षण करणे शक्य होणार आहे. याचा फायदा जन आरोग्य राखण्यात तर होईलच, शिवाय गौशाळांनाही आर्थिक फायदा मिळून ते गायींना आणखी चांगला आहार देऊ शकतील, असे सूत्राचे मत आहे. विशेष म्हणजे, महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनीच याबाबतची कल्पना सर्वप्रथम सादर केली होती.