स्मार्टफोनपेक्षाही स्लीम सोनीचा ब्राव्हिया टिव्ही

sony
लासवेगास- येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रोनिक शो २०१५ मध्ये सोनीने अँड्राईड बेस्ड टिव्ही ब्राव्हिया ४ के सिरीज मध्ये चार नवे एलइडी टिव्ही लाँच केले असून त्यातील एक जगातला सर्वात स्लीम टिव्ही आहे. हा टिव्ही स्मार्टफोनपेक्षाही स्लीम आहे.

सोनीच्या फोर के एलईडी टिव्हीच्या नव्या एक्स ९००० सी सिरीजमध्ये ५५ व ६५ इंची हे मॉडेल सादर केले गेले आहे. या मॉडेलची जाडी आहे अवघी ४.९ मिमी. या टिव्हीचे सर्व श्रेय कंपनीने नवीन क्रांतीकारी फ्लोटिंग स्टाईल तंत्रज्ञानाला दिले आहे मात्र टिव्हीच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत. या वर्षात साधारण सप्टेंबर आक्टोबरमध्ये हे टिव्ही बाजारात दाखल होतील.

या सिरीजमधले सर्व ब्राब्हिया टिव्हीसाठी गुगल अँड्राईड प्लॅटर्फार्मवर चालणार असून ते गेमिंगसाठीही अतिशय मस्त आहेत. यात गुगल प्लेची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment