लोम्बार्गिनीचा स्मार्टफोन- किंमत अवघी ३ लाख ७० हजार

lumborghini
दुस-यावर इंप्रेशन मारण्याचा आपल्याला खूपच छंद आहे आणि पैशांची कांही कमतरता नाही अशा लोकांसाठी एक खूष खबर आहे. या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी लोम्बार्गिनीने त्यांचे टोनिनो लोम्बार्गिनी 88 टायवरी स्मार्टफोन लास वेगास येथील सीईएस 2015 प्रदर्शनात सादर केले आहेत. स्टेनलेस स्टील आणि लेदर अशा दोन प्रकारची बॉडी असलेले हे स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच केले गेले असून त्यांची किंमत आहे फक्त 3 लाख 70 हजार.

अनलॉक डिव्हाईस स्वरूपात त्यांची विक्री केली जात असून हा स्मार्टफोन इंटरनॅशनल ट्रॅव्हल ड्यूएल सिम अक्सेप्ट करतो. 5 इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड ओएस. 20 एमपीचा रियर तर 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी याची अन्य फिचर्स आहेत. प्रत्येक फोन हाताने असेंबल केला जातो आणि प्रत्येक युनिटला युनिक आयडेंटिटी नंबरही दिला गेला आहे. पाच रंगात हे फोन उपलब्ध आहेत. कंपनीच्या वरीष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे या फोनची मागणी पुरी करणेच अवघड होईल इतका प्रतिसाद त्याला मिळत आहे.

या फोनचा लोम्बार्गिनी कार कंपनीशी थेट संबंध नाही. लोम्बार्गिनी ऑटो डिझायनर फे रोसिया लोम्बार्गिनीचा मुलगा टोनिनी याने हा फोन बनविला आहे. कंपनीचे सीईओ बॉब हेटफी यांच्या मते हा स्मार्टफोन सर्व लोकांत वेगळे दिसण्याचा खास मार्ग आहे. यात तंत्रज्ञानाबरोबर लग्झरीही आहे आणि आम्ही व्हॉल्युमला महत्त्व देत नाही.

Leave a Comment