आसुस केला जगातील पहिला ४जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच!

asus
लास वेगास : आसुस या मोबाईल कंपनीने ४ जीबी रॅम असलेला आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१५ या एक्झिबिशनमध्ये लाँच केला असून ४ जीबी रॅम असलेला जेनफोन सिरीजमधला दुसरा स्मार्टफोन आसुसने लाँच केला.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा स्मार्टफोन कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र हा ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन मार्च महिन्यात बाजारात येणार आहे. आसुसने आपल्या या मॉडेलच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

zenphone

आसुस जेनफोनचे फिचर्स- – आसुस जेनफोन – हा ४ जीबी रॅम असलेला पहिला स्मार्टफोन आहे. एका वेरियंटमध्ये २ जीबी एलपीडीडीआर३ रॅम तर दुसऱ्या मॉडेलमध्ये ४ जीबी एलपीडीडीआर३ रॅम आहे. या फोनमध्ये २.३ गीगाHz वर चालणारा ६४ बिट इंटेल ऐटम झेड३५८० क्वाड-कोर प्रोसेसर आहे.

जेनफोन-2 चे दोन्ही मॉडेल १६जीबी, ३२जीबी आणि ६४जीबी इंटरनल मेमरी मॉडल्समध्ये उपलब्ध होणार आहेत. या फोनमध्ये ६४ जीबी पर्यंतचे मायक्रो एसडी कार्डदेखील लावता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कलर रियल टोन फ्लॅश, ऑटोफोकस लेंससहित १३ मेगा पिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन ड्यूअल मायक्रो सिमला सपोर्ट करतो. यातील २ जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत जवळपास १२ हजार ६०० रूपये इतकी असेल. या सर्व हटके फिचर्समुळे हा स्मार्टफोन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment