नासाने लावला नव्या ग्रहांचा शोध

nasa
मायामी : नासातील खगोलशास्त्रज्ञांनी पाणी तसेच जीवाचे अस्तित्व असण्याची शक्यता असलेल्या दोन ग्रहांसह एकूण आठ नव्या ग्रहांचा शोध लावल्याचा दावा केला आहे.

पृथ्वीच्या सूर्यमालेच्या बाहेरील हे सर्व ग्रह असून आठपैकी दोन ग्रह हे पृथ्वीसारखेच दिसत असल्याचे अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांच्या २२५ व्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीएवढा आकार असणा-या दोन्ही ग्रहांचा पृष्ठभाग हा खडकाळ असून त्यावर पाणी आणि जीवाचे अस्तित्व असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आम्ही पृथ्वीसारख्या अन्य दोन ग्रहांचा शोध लावला आहे, अशी माहिती यावेळी केप्लर सायन्स कार्यालयातील फरगेल मुल्ले यांनी दिली आहे. अवकाशीय दुर्बिणीद्वारे नवे ग्रह शोधण्याच्या नासाच्या मोहिमेंतर्गत २००९ पासून आजतागायत पृथ्वीच्या सूर्यमालेशिवाय अन्य सूर्यमालेतील दीड लाखांपेक्षाही अधिक नव्या ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे. नुकत्याच शोधण्यात आलेल्या पृथ्वीसारख्या दिसणा-या दोन ग्रहांवर जीवाचे अस्तित्व असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अधिक माहिती मिळविण्याचे मोठे आव्हान असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a Comment