सॅमसंगची सर्वात छोटी हार्डडिस्क

samsung
लास वेगास : सीगेटच्या ७ मिमि जाडी असलेली तर सॅमसंगने व्हिजिटिंग कार्डपेक्षाही छोटी असलेली हार्डडिस्क सादर केली आहे. संगणकासाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या ५.२५ इंच हार्डडिस्क निर्मितीच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त जगातील या आघाडीच्या कंपन्यांनी नवीन हार्डडिस्क सादर केल्या आहेत.

सीगेटने ५०० जीबी क्षमता असलेली तसेच केवळ ७ मिमि जाडी असलेली हार्डडिस्क सादर केली आहे. त्याची किंमत ९९ डॉलर एवढी असून ती केवळ अमेरिकेमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. सॅमसंगनेही बिझनेस कार्डपेक्षाही छोटी आणि केवळ २८.३४ ग्रॅम वजन असलेली तसेच १ टेराबाईट माहिती साठविण्याची क्षमता असलेली नवी युएसबी हार्डडिस्क सॅमसंगने बाजारात आणली आहे. याच प्रकारात २५० जीबी आणि ५०० जीबी क्षमतेचीही हार्डडिस्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ ८ सेकंदांमध्ये तीन जीबी माहिती हस्तांतरणाची या डिस्कची क्षमता असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे. यासाठी क्षमतेप्रमाणे १७९.९९ डॉलरपासून, ५९९.९९ डॉलरपर्यंतची किंमत निश्चित करण्यात आली आहे. सॅमसंग लवकरच अमेरिकेसह युरोप आणि आशियामध्येही ही डिस्क उपलब्ध करून देणार आहे. मात्र सॅमसंग आणि सीगेटने सादर केलेल्या या दोन्ही हार्डडिस्क भारतीय बाजारपेठेत आणलेल्या नाहीत.

Leave a Comment