मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या एका चर्चासत्रा दरम्यान भूगर्भशास्त्रज्ञ व्ही. सुब्रमण्यम यांनी आगामी काही वर्षांमध्ये मुंबईत भूकंपाचे धक्के बसणार असल्याची भीती व्यक्त केली असून त्याचबरोबर हे भूकंपाचे धक्के ६.२ ते ६.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईला भूकंपाचा धोका!
मुंबईत सुरु असलेल्या गगनचुंबी इमारतींची निर्मितीचे काम थांबले पाहिजे. विशेषत: २३ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना अधिक धोका आहे. शिवाय विचित्र पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या इमारतींसाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र मुंबई महापालिका ही इमारतींच्या वाढत्या मजल्यांवर आणि वाढत्या इमारतींबाबत गंभीर नाही, अशी खंतही व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर भूगर्भ शास्त्रज्ञांकडून या संपूर्ण परिसराचा अभ्यास करवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही व्ही. सुब्रमण्यम यांनी केली आहे.