लेनोवोने त्यांचा नवा टॅब्लेट लेनोवो योगा २ एनी पेन फिचरसह सादर केला असून या महिन्यातच तो बाजारात येणार आहे. टॅब्लेटचा स्टायलस हरविला तर अनेकवेळा टॅब्लेट वापरताना युजरला अडचण येऊ शकते आणि हीच अडचण लक्षात घेऊन लेनोवोने त्यांचा हा टॅब्लेट तयार केला आहे. नावाप्रमाणेच हा कंट्रोल करताना पेन, पेन्सिल, किल्ली अथवा त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूने सुरू करता येणार आहे आणि वापरता येणार आहे. टॅब्लेट किंमत अंदाजे १९ हजार रूपयांच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे.
लेनोवोच्या योगा टॅब्लेटवर वापरा कोणतेही पेन
या टॅब्लेटसाठी ८ इंची फल एचडी डिस्प्ले, विडोज ८.१ ओएस, ८ एमपीचा कॅमेरा, डॉल्बी ऑडिओ, ड्युअल फ्रंट फेसिग स्पीकर्स, ऑफिस ३६५ व मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन प्रोसेसिंग स्वीट चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन अशी अन्य फिचर्स आहेत.