मार्क झुकेरबर्गने सुरू केला बुक क्लब

mark
पुस्तके वाचण्यासंदर्भात फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्गने त्याला दिलेले आव्हान स्वीकारले असून ते पुरे करण्यासाठी बुक क्लब २०१५ सुरू केला आहे. या संदर्भातली माहिती मार्कने स्वतंत्र फेसबुक पेजवर दिली आहे.ए इयर ऑफ बुक असे या पेजचे नामकरण केले गेले आहे.

मार्कने यात दर दुसर्‍या आठवड्याला तो एक पुस्तक वाचून संपविणार असल्याचे सांगितले असून आपल्या मित्रांनाही या बुकक्लबमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मार्क म्हणतो, पुस्तके वाचताना जगातील विविध परंपरा, तंत्रज्ञान या संदर्भात माहिती मिळविण्यावर भर देणार आहे. मार्कच्या पेजला आत्ताच १ लाखाहून अधिक लाईक्स आल्या असल्याचेही समजते.

मार्क म्हणतो मला मिळालेल्या रिडींग चॅलेजमुळे मी फारच एक्साईट झालोय. पुस्तक वाचनामुळे कोणताही विषय पूर्ण माहिती होण्यास मदत होते शिवाय त्यामुळे आपली विचारप्रक्रियाही सुरू राहते. ही संधी अन्य मिडीयात मिळत नाही. मी जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतोय. मॉईसेस नॅम यांचे द एड ऑफ पॉवर या पुस्तकापासून मार्कने सुरवात केली आहे. विशेष म्हणजे ही बातमी येताच रविवारी हे पुस्तक आऊट ऑफ स्टॉक झाले असल्याचेही समजते.

Leave a Comment