मुंबई – कोरियन स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने नवीन वर्षात धमाकेदार एन्ट्री केली असून आज देशात चार नवे स्मार्टफोन लाँच केले असून यात मेटल युनिबॉडी आणि सर्वात स्लिम असलेले गॅलॅक्सी ए३ आणि गॅलॅक्सी ए५ या स्मार्टफोनचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सॅमसंगने गॅलॅक्सी ई५ आणि ई७ हे नवे स्मार्टफोनही पहिल्यांदाच भारतात लाँच केले आहेत.
सॅमसंगची नवीन वर्षात धमाकेदार एन्ट्री
जाणून घ्या कोणते आहेत हे स्मार्टफोन
सॅमसंग गॅलॅक्सी ए३ – ४.५ इंचाचा डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, एक जीबी रॅम, आठ मेगापिक्से रेयर कॅमेरा, पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, किंमत – २० हजार ५००
सॅमसंग गॅलॅक्सी ए५ – पाच इंचाचा डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, दोन जीबी रॅम, १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, किंमत – २५ हजार ५००
सॅमसंग गॅलॅक्सी ई५ – पाच इंचाचा डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, १.५ जीबी रॅम, आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, किंमत – १९ हजार ३०० रुपये
सॅमसंग गॅलॅक्सी ई७ – ५.५ इंचाचा डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, १.२ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर, दोन जीबी रॅम, १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, किंमत – २३ हजार रुपये