चूक दुरूस्त करण्याची संधी देणार आयफोन स्ट्रिंग अॅप

string
मित्रमैत्रिणींना मेसेज पाठविणे, फोटो पाठविणे, व्हिडीओ पाठविणे हा आजकाल रोजच्या उद्योगातला एका अविभाज्य भाग झाला असला तरी अनेकवेळा आपण हा मेसेज, फोटो, व्हीडीओ पाठवायला नको होता, थोडी चुकच झाली अशी भावनाही अनेकजणांच्या मनात येत असते. ही चूक सुधारण्याची आणि आपले खासगीपण कायम राखण्याची संधी आयओएस आयफोन मोबाईल अॅपमुळे उपलब्ध झाली आहे. स्ट्रींग नावाचे हे अॅप ही संधी तुम्हाला देऊ शकते.

या अॅपमुळे तुम्ही कुणालाही मेसेज, फोटो, आपला डेटा अथवा व्हीडीओ पाठविला आणि तो संबंधिताच्या फोनवरून तुम्हाला काढून टाकायचा असेल तर त्या हे अॅप मदत करते. याचाच अर्थ तुम्ही शेअर करत असलेल्या डेटावर तुमचा कंट्रोल राहतो. स्नॅपचॅट, क्लस्टर यांच्याप्रमाणेच हे अॅप आहे. मात्र स्नॅपचॅटवर आपण पाठविलेला मेसेज दुसर्‍याने शेअर केला की गायब होतो तर क्लस्टरवर फोनवरूनच फोटो डाऊनलोड करता येतात. मात्र स्ट्रिंग अॅपमध्ये तुम्ही फोटो, मेल कांहीही पाठविले असेल तरी जोपर्यत तुमची परवानगी नाही तोपर्यंत फोटो वा तत्सम डेटा सेव्ह करता येत नाही.

एखाद्याने जादा हुषारी दाखवून हा डेटा स्क्रीन शॉर्ट करून सेव्ह करण्याचा प्रयत्न केलाच आणि असा प्रयत्न तीन वेळा केला गेला तर स्ट्रिंग अॅप सबंधिताचे अकौंटच बंद करून टाकते. विशेष म्हणजे युजरने पाठविलेला मजकूर डिलिट केला की तो स्ट्रिंग सर्व्हरमधूनही डिलिट होतो यामुळे आपले खासगीपणे जपणे शक्य होते. हे अॅप मोफत डाऊनलोड करता येते मात्र त्यासाठी सध्या एक अट आहे ती म्हणजे तम्ही आणि ज्याला डेटा पाठविता त्याच्याकडेंही आयफोनच असला पाहिजे. लवकरच हे अॅप विंडोज आणि अँड्राईडवरही उपलब्ध होणार आहे असेही समजते.

Leave a Comment