जमिनीवरील आद्रतेचा वेध घेणार स्मॅप

nasa
न्यूयॉर्क : आता पृथ्वीवरील जमिनीत असणारी आद्रता मोजण्याचे काम अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ चे स्मॅप (मॉईश्चर अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह) हे उपकरण करेल. या उपकरणामध्ये रडार, रेडिओ मीटर आणि मेश अँटेना या तीन घटकांचा समावेश आहे. याच महिन्यात २९ जानेवारी रोजी या उपकरणाचे अंतराळात प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे उपकरण जेव्हा स्वत:च्या तरंग लहरी सोडेल, तेव्हा ते कार्यान्वित समजले जाईल.

‘नासा’ ने या नव्या उपकरणासंबंधीची सविस्तर माहिती स्वतंत्र निवेदनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. ‘नासा’ च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील संशोधकांनी या उपकरणातील अँटेना तयार केला असून त्या माध्यमातून अधिक अचूकपणे वातावरणातील आद्र्रतेचा वेध घेता येणार आहे. रेडिओ मीटर आणि रेडिओ सिग्नलमुळे ‘स्मॅप’ अधिक प्रभावीपणे काम करू शकेल. हे तंत्रज्ञानच या उपकरणाचा आत्मा असल्याची माहिती ‘नासा’ च्या संशोधकांनी दिली.

Leave a Comment