जगातला सर्वात पिटुकला रनवे

runway
नेदरलँड देशातील सबा बेटावर जगातील सर्वात लहान कमर्शिअल रनवे आहे. जुआन्वो ई रास्चिन या एअरपोर्टच्या अखत्यारीतील हा रनवे पर्यटनासाठी हातभार लावण्यात मोठाच महत्त्वाचा ठरला आहे.

या रनवेची लांबी आहे अवघी १३०० फूट. हा रनवे केवळ छोटा आहे इतकेच नाही तर तो अत्यंत अवघड जागीही आहे. त्यामुळे येथे विमान उतरविणारा पायलट हा अत्यंत कुशल आणि अनुभवीच असावा लागतो. कारण या रनेवेच्या एका बाजूला आहेत प्रचंड मोठे डोंगर तर दसर्‍या बाजूला आहे समुद्र. म्हणजे डोंगर आणि समुद्राच्या कचाट्यात हा रनवे सापडला आहे असे म्हटले तरी नवल वाटायला नको.

येथे विमान उतरविणार्‍या पायलटचे लक्ष चुकून जरी दुसरीकडे गेले तर विमानाचा अपघात ठरलेलाच. १८ सप्टेंबर १९६३ साली हा रनवे खूला झाला आणि नंतर येथील नागरिकांचे जीवनमान एकदमच बदलून गेले. पूर्वी आठवड्यातून एखादे विमान येथे यायचे आता मात्र दररोज चार विमाने येथे येतात आणि त्याचे कारण आहे देशात वाढलेले पर्यटन. पर्यटकांना या विमानतळाचीही खूपच उत्सुकता असते.

विमानतळावरील एकमेव इमारतीतच इमिग्रेशन, टर्मिनल, सुरक्षा, आग विभागाची सर्व कार्यालये आहेत. विशेष म्हणजे विमानांसाठी येथे इंधन मात्र दिले जात नाही.

Leave a Comment