चेहरेपट्टीवरून शेरेबाजी कराल तर तुरूंगाची हवा खाल

chinki
चिंकी, चायनीज, मोमोज अशा कांही विशेष नावांनी तुम्ही कुणाला हिणवत असाल अथवा शेरेबाजी करत असाल तर यापुढे असे शब्द वापरू नका कारण त्यासाठी तुरूंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद इंडियन पीनल कोडमध्ये करण्यात आली आहे. असे शब्द वापरून हेटाळणी करणार्‍यांना पाच वर्षे कैद आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.

विशेषतः पूर्वोत्तर राज्यातून अन्य राज्यात शिक्षण, नोकरी वा अन्य कांही कारणांनी आलेल्या लोकांना त्यांच्या चेहरेपट्टीवरून नेहमीच शेरेबाजी ऐकावी लागते आणि दीर्घकाळपासून चेहरेपट्टीवरून अशी शेरेबाजी हा दंडनीय अपराध गणला जावा अशी या राज्यातील लोकांची मागणी होती. सरकारने त्याची दखल घेऊन दिल्लीत अरूणाचलच्या विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर या संदर्भात बेजबरूआ समिती स्थापन केली होती. या समितीने पूर्वोत्तर राज्यातील लोकांची सुरक्षा आणि अन्य अडचणींवर समाधानकारक उपाय योजण्यासाठी अध्ययन केले आणि त्यानुसार आयपीसी च्या कलम १५३ मध्ये दुरूस्ती करून त्यात कलम ५०९ व ५०९ ए जोडण्याची शिफारस केली.

या शिफारसीनुसार शरीर ठेवण, संस्कृती, ओळख वा अन्य शारीरिक शेरेबाजी करणे हा अपराध मानण्यात आला असून सरकारनेही त्याला मान्यता दिली आहे आणि कायदा मंत्रालयानेही या बदलाला अनुमती दिली आहे.

Leave a Comment