नवी दिल्ली – नवीन वर्षात बेरोजगारांना रोजगाराच्या बंपर संधी मिळणार असून यावर्षात नवीन नोकर्या तयार करण्याचे भारतातील उद्योगजगताने ठरवल्यामुळे तब्बल १० लाख बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याच प्रमाणे नोकरदारांनाही ४० टक्के वेतनवाढ मिळणार आहे. यंदा १० लाख आहे. यंदा नोकरभरतीसाठी सोशल मीडिया, मोबाईल फोन आदींचा वापर केला जाणार आहे.
नववर्षात बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी
राष्ट्रीय उत्पन्न यंदा भारताचे ५.५ टक्के होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व व्यवसायांमध्ये वाढ होणार असल्याने नवीन नोकर्या तयार होणार आहेत. यंदा सर्वच कंपन्यांनी आक्रमकपणे नवीन भरती करण्याचे ठरवले असून व्यवस्थापनांमध्ये त्याबाबत धोरणात्मक आखणी सुरू झाली आहे. परदेशी कंपन्या भारतात येत असून त्यामुळेही रोजगारात वाढ होणार आहे.