मायक्रोसॉफट इंटरनेट एक्स्प्लोरर बंद करणार

internet
गेली अनेक वर्षे इंटरनेट एक्स्प्लोअरशी संलग्न असलेल्या मायक्रोसॉफटने नवीन विंडोज १० लाँच करताना नवा ब्राऊझर आणण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या या नव्या ब्राऊजरचे कोडनेम स्पार्टन असे ठेवले गेले आहे. जानेवारीत होत असलेल्या मायक्रोसॉफटच्या इव्हेंटमध्ये या ब्राऊजरचे खरे नांव जाहीर केले जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

इंटरनेट एक्स्प्लोअरच्या जागी तयार केला जात असलेला नवा ब्राऊजर मोझिला फायरफॉक्स किवा गुगल क्रोमसारखाच दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कॉमन वेबकिट ऐवजी त्यात मायक्रोसॉफ्ट चक्र जावा स्क्रिप्ट व ट्रायडेंट इंजिनचा वापर केला जाणार असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. नवा ब्राऊजर इंटरनेट एकस्प्लोररपेक्षा खूपच वेगवान असेल असेही समजते.

Leave a Comment