रशियन वैज्ञानिकांना इबोला प्रतिबंधक लस शोधण्यात यश

ebola
नवी दिल्ली : इबोला विषाणूवर रशियन वैज्ञानिकांनी लस शोधली असून लवकरच या लशीच्या चाचण्या आफ्रिकेत घेण्यात येणार आहेत. ही लस सेंट पीटर्सबर्ग येथील ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्लुएंझा’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केली असून फेब्रुवारीत तिच्या चाचण्या आफ्रिकेत पूर्ण होत आहेत.

रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्लुएंझा या संस्थेचे संचालक ओलेग किसेलेव यांनी ही प्रायोगिक लस आमच्या संस्थेतील तरूण वैज्ञानिकांनी तयार केली असल्याचे सांगितले.या लशीच्या प्राण्यांवरील चाचण्या घेतल्या जातील व नंतर आफ्रिकेत वैद्यकीय स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या जातील, चाचणीचे सर्व टप्पे फेब्रुवारीत पूर्ण होतील असे ते म्हणाले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इनफेक्षियस डिसीजेस या संस्थेच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, इबोलावरील पहिली लस ही सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. चीनमधील संशोधकांनी इबोलावर लस तयार केली असून त्याच्या चाचण्या माणसांवर केल्या जातील. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार इबोलाने ७६९३ बळी घेतले असून १९६९५ जणांना प्रादुर्भाव झाला आहे. पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया, सिएरा लिओन व गिनी या देशांना या रोगाचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment