उद्यापासून डेपोत कचरा येऊ न देण्याची फुरसुंगीकरांची भूमिका

kachra
पुणे: पालकमंत्री गिरीश बापट यांची गावकऱ्यांसोबत झालेली आजची बैठक निष्फळ ठरल्यामुळे पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुण्यातील कचरा डेपोचा प्रश्न मागील वर्षांपासून प्रलंबित असून पालकमंत्री, गावकरी आणि पालिका पदाधिकाऱ्यांची कचरा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र फुरसुंगी ग्रामस्थांनी आज झालेली बैठक फिसकटल्यानंतर उद्यापासून डेपोत कचरा येऊ देणार नसल्याची कडक भूमिका भूमिका फुरसुंगी ग्रामस्थांनी घेतल्याने पुणेकरांचे धाबे दणाणले आहेत. पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांनी नव्या कचरा डेपोसाठी आणखी कालावधी हवा अशी भूमिका घेतली असून पालकमंत्री गिरीश बापट यांनी उद्या गावकऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

Leave a Comment