पेशावर – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा कट रचण्याप्रकऱणी दोषी ठरलेला पाकिस्तानी हवाई दलाचा कनिष्ठ तंत्रज्ञ नियाझ मोहम्मदला बुधवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तानात हत्येचा कट रचणा-याला फाशी
खैबर पख्तुनवाला प्रांतातील स्वाबी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नियाझने परवेझ २००३ मध्ये मुशर्रफ यांच्या हत्येचा कट रचला होता. अटकेनंतर त्याला हरिपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत सात दोषींना फाशी देण्यात आली असून तर २००९मध्ये आर्मी हेडक्वार्टरवरील झालेल्या प्रकरणातील एका दोषीला फाशी देण्यात आली आहे.