ताशी १६०० किमी वेगाने धावणारी कार

bloodhound
न्यूयॉर्क : हे एक प्रकारचे यानच आहे. याची रचना थोडीशी कार तर थोडीशी जेट फायटरसारखी आहे; परंतु याचा वेग सांगितला तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सर्वांत वेगवान विमान कॉनकॉर्डच्या वेगापेक्षा याचा वेग थोडासाच कमी आहे. इंजिनिअर्सनी ठरविल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या तर नव्या पिढीच्या या कॉनकॉर्ड कारचा वेग ताशी १६०० किलोमीटर असेल.

ब्लडहाऊंड प्रोजेक्टचे मुख्य अभियंता मार्क चॅपमॅन यांनी सांगितले की, पहिले थ्रस्ट एसएससी इंजिन कारला ताशी ७६३ मैलांचा वेग देण्यापुरतेच होते. ब्लडहाऊंड एसएससी कारमध्ये एक-दोन नव्हे तर तीन इंजिन आहेत. पहिले दोन इंजिन एकत्र असून तिसरे रेसिंग कारप्रमाणे आहे जे कारला रॉकेटसारखा वेग देईल. हे इंजिन २० टन ताकदीने सुपरसॉनिक कारला वेग देतील. चॅपमॅन यांनी सांगितले की, ब्लडहाऊंड एसएससी कार ताशी १६०० किलोमीटर वेगाने ठरविलेले लक्ष्य साध्य करू शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment