नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्याने तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, यामुळे मोदी सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त करून आम जनतेला दिलासा देण्याची शक्यता असून नक्की किती कपात होणार हे अजूनपर्यंत गुलदस्त्यातच आहे.
केंद्र सरकारकडून नवीन वर्षाचे गिफ्ट!
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुपयाचे मूल्य घटल्याने इंधनाच्या बॅरलमध्ये मिळणारा फायदाही कमी झाला असून दोन आठवड्यांपूर्वी डॉलरच्या प्रमाणात रुपयाचा असणारा ६१.९५ दर आता ६३.२६ वर पोहचला आहे. इंधनांच्या दरात ही घट जाहीर केली गेली तर ही पेट्रोलच्या दरातली सलग नवव्यांदा तर डिझेलच्या दरांत पाचव्यांदा कपात असेल.