आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर !

jadhav
नागपूर – औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना हिवाळी अधिवेशना दरम्यान पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. पोलिस निरीक्षकाच्या कानशिलात लगावल्यामुळे सोनेगाव पोलिस ठाण्यात आमदार जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काही आमदार वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. उध्दव ठाकरे यांच्या खोली समोरच जाधव यांची खोली होती. काही आमदारांसोबत ठाकरे यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असताना ठाकरे यांच्या खोलीकडे जाण्यासाठी आमदार जाधव निघाले. परंतु, पोलिस निरीक्षकाने त्यांना प्रवेश नाकारला. परिणामी संतप्त आमदार जाधव यांनी पोलिस निरीक्षकाच्या कानशिलात लावली. निरीक्षक जाधव यांनी वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. तातडीने त्यांनी जामीनासाठी अर्ज केला.

Leave a Comment