१३ वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्ष मोहीम संपुष्टात ?

nato
लंडन : गेल्या १३ वर्षांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेली आंतरराष्ट्रीय संघटना ‘नाटो’ च्या फौजांची संघर्ष मोहीम अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. अफगाण फौजांना पाठबळ देणारे नवे पर्व आता सुरू होत आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणारे जनरल जॉन कॅम्पबेल यांनी सांगितले की, उज्ज्वल भविष्याच्या आशेने आम्ही निराशेच्या अंधःकारातून अफगाणिस्तानला बाहेर काढले आहे. ‘बीबीसी’ यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आयोजित एका कार्यक्रमात नाटो फौजांच्या अधिका-यांनी आपला झेंडा उतरविला आणि ‘रिझॉलूट सपोर्ट’ या नव्या मोहिमेचा झेंडा फडकाविला.

नाटो आघाडीच्या फौजांची भूमिका नव्या वर्षात १ जानेवारीपासून बदलणार आहे. नव्या मोहिमेला पाठिंबा देणे आणि अफगाण फौजांना प्रशिक्षण देणे, असे त्यांचे काम राहील.

Leave a Comment