विदर्भात बारा शेतक-यांच्या आत्महत्या

farmer
नागपूर : अवघ्या ७२ तासांत विदर्भात १२ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळाच्या तडाख्यात यंदा राज्यातील शेतकरी होरपळत असल्यामुळे विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या सत्र अद्यापही सुरूच आहे. आत्महत्या करणा-यांत कापूसउत्पादक शेतक-यांचा समावेश असल्याची माहिती विदर्भ जन आंदोलन समितीचे प्रमुख यांनी दिली.

विदर्भात कापसाचे मोठे उत्पादन होते. यंदा कापसाला सरकारने चांगला हमीभाव दिलेला नाही. त्यामुळे पिकासाठी केलेला खर्चही भरुन निघाला नाही. त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतक-यांसमोर उभ्या राहिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चिखलवर्धा गावातील सय्यद अन्सर अली, दाहेगावमधील खुशल कपासे, मांगकिन्ही गावातील पुनाजी मानवार, तांबा गावांतील सोमेश्वर वाडे, निगनूर गावांतील मारोती राठोड यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच वर्धा जिल्ह्यातील पिंपळगावमधील मधुकर अडसर, देओली गावातील विठ्ठल तायवडे, पिंपळगावातील मारुती गोडे यांनी आत्महत्या केली. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शिवानी गावातील शिवानंद गीते, गावठाणा गावातील सुनील राखुंडे यांनी आत्महत्या केली. तसेच वाशीम जिल्ह्यातील रेगाव गावातील संजय दाखोरे तर अमरावती जिल्ह्यातील गुंजी गावातील निलेश वाळके यांनी आत्महत्या केली आहे. विदर्भातील शेतक-यांच्या आमहत्येचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांना हमीभाव वाढवून द्यावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

Leave a Comment