महेंद्रसिंह धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

dhoni
मेलबर्न – कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तडकाफडकी घोषणा भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन ‘कूल’ महेंद्रसिंह धोनीने केली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ६ जानेवारीपासून सुरू होणार्‍या चौथ्या कसोटीत महेंद्रसिंह धोनी मैदानात एक खेळाडू म्हणून दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहली हा टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार असल्याची माहिती दिली.

भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी याची ओळख आहे. भारताने २००७ मध्ये ट्वेंटी-ट्वेंटी आणि त्यानंतर २०११ मध्ये पन्नास षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद त्याच्या नेतृत्वाखाली पटकावले होते. कसोटीमध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता.

एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी धोनीने कसोटीमधून निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल बीसीसीआयने ढोणीचे आभार मानले आहेत. ढोणीने तात्काळ प्रभावाने निवृत्त झाला असून, त्याच्या जागी विराट कोहली शेवटच्या सिडनी कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

Leave a Comment